Ads

-

‘पुण्या’साठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून IAS अधिकारी नेमा!

By Xtralarge News

July 3, 2020 6:57 pm

Ads

पुणे, दि. ३ जुलै २०२०

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी ‘टेस्टींग इन्चार्ज’ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची (IAS ) नेमूणक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे.ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी. तसेच काम करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment