Ads

-

वनमंत्री संजय राठोड शक्तीप्रदर्शन करत पोहरागडावर!

By Xtralarge News

February 23, 2021 8:00 pm

Ads

आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका!

वनमंत्री संजय राठोड यांचे पोहरागडावर शक्तीप्रदर्शन .
वाशिम, दि. २३ फेब्रुवारी.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळं वादात सापडलेले ठाकरे सरकार मधील वनमंत्री संजय राठोड आज दोन आठवड्यानंतर प्रथमच सर्वांसमोर आले. हजारो समर्थकांच्या साक्षीने पोहरादेवी गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले व नंतर पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली.

संजय राठोड म्हणतात ‘पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण केले जात असून ते चुकीचे आणि निराधर आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मात्र, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जातं आहे. हा प्रकार माझी सामाजिक, राजकीय, आणि वैयक्तिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आले आहे त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका, अशी विनंती राठोड यांनी केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment