Ads

-

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन अध्यासन केंद्रास मंजुरी

By Xtralarge News

February 14, 2021 11:00 am

Ads

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन अध्यासन केंद्रास मंजुरी.

नांदेड, दि. 14 फेब्रुवारी :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्व.शंकरराव चव्हाण असे तीन अध्यासन केंद्र सुरु करणार असल्याचे सांगून प्रत्येक अध्यासन केंद्रास ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ नांदेड’ हा अभिनव उपक्रमात जाहीर केले.

प्रबोधनकार अभ्यास केंद्र देखील विद्यापीठामध्ये सुरु करण्यात येणार आहे असेही जाहीर केले. महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यापैकी नांदेड विद्यापीठ हे एक आहे. इतर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आहे.

विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉल येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नांदेड’ या अभिनव उपक्रमामध्ये ते विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांना संबोधित करीत होते. या उपक्रमामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले असून ३२२ अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले.

विद्यापीठ परिसरामध्ये गणितीयशास्त्र संकुलाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. संकुलाच्या नवीन इमारतीत आयसीटीने सुसज्ज अशा ३ वर्ग खोल्या आहेत. त्याबरोबरच संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या विविध सॉफ्टवेअरने परिपूर्ण अशा २ संगणक प्रयोगशाळा व संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधनपूरक असे २ संशोधन कक्ष आहेत.

 

No comments to show.

Leave a Comment