राज्यपालांना विमानातून खाली उतरवले!
ठाकरे सरकारचा राज्यपालांशी पंगा..
मुंबई, दि. ११ फेब्रुवारीः
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज विमानातून खाली उतरवण्यात आले. राज्यपाल हे उत्तराखंडच्या डेहराडूनला जाण्यासाठी मुंबईत विमानात बसले होते पण अखेरच्या क्षणी त्यांना विमान प्रवासाची परवानगी नाही असे सांगितले गेले. हे विमान राज्य सरकारचे आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरवल्याने ठाकरे सरकारने राज्यपालांना जाणीवपूर्वक परवानगी दिली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास करत होते. मात्र, सरकारनेच परवानगी नाकारल्याने राज्यपाल व त्यांच्यासोबत असलेले अधिकारी खासगी विमानाने देहरादूनला गेले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवून दोन महिने झाले तरी त्यावर त्यांनी निर्णयच घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये राज्यपालांबद्दल तीव्र नाराजी आहे.
ठाकरे सरकारची कोंडी करण्याची एकही संधी राज्यपाल सोडत नाही. ठाकरे सरकार व राज्यपाल कोश्यारी यांच्यातले संबंध पहिल्यापासूनच चांगले नाहीत.
Leave a Comment