Ads

---

आषाढीच्या शासकीय महापूजेचा मान ‘या’ वारकऱ्याला मिळाला !

By Xtralarge News

June 30, 2020 4:38 pm

Ads

सोलापूर/पंढरपूर, दि. ३० जून २०२०

आषाढी वारीच्या शासकीय महापुजेत मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकऱ्याला या पुजेचा मान दरवर्षी मिळतो. एकादशी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दर्शन बंद करताना रांगेतील पहिल्या वारकऱ्याला हा मान दिला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे दर्शनरांगच बंद आहे. त्यामुळे मंदिर समितीने विठ्ठलाची सेवा करणाऱ्या विणेकऱ्यांना हा मान देण्याचे ठरवले.मंदिरात विठ्ठलाची सेवा करणारे सहा विणेकरी आहेत. त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातून यंदाचा मानाचा वारकरी ठरवण्यात आला.

यंदा हा मान विठ्ठल ज्ञानदेव बडे या वारकऱ्याला मिळाला असून ते सहा वर्षांपासून विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणूत देवाची सेवा करत आहेत. बडे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूरचे रहिवासी असून सध्या ते पंढरपुरातच राहतात. बडे यांचे कुटुंब माळकरी आहे. मुख्यमंत्र्याबरोबर त्यांना यंदाच्या शासकीय पुजेचा मान मिळाला आहे.

No comments to show.

Leave a Comment