Ads

-

संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध आहे का?

By Xtralarge News

January 1, 2021 1:33 pm

Ads

संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध आहे का?

पुणे, दि. १ जानेवारी

औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेने शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आवाज उठवला असताना शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समिती समोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करताच भाजपाने यात उडी घेतली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या विषयावर म्हणाले, “औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती.

 

No comments to show.

Leave a Comment