Ads

-

बाई डोक्यावर पडलीय का हो, भाऊ ?

By Xtralarge News

December 30, 2020 1:16 pm

Ads

बाई डोक्यावर पडलीय का हो, भाऊ ?
उर्मिला मातोंडकरांचा कंगणा रनौटला टोला.

मुंबई, दि. ३० डिसेंबर:
आपल्या बोलण्याने सतत वाद ओढवून घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौटने मुंबईत परतताच शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. कंगणाला आधीच शिवसेने धो धो धुतला होता आता पुन्हा तिनेच आगीत तेल ओतल्यामुळे शिवसेनेकडून प्रत्युत्तर तर मिळणारच पण यावेळी शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगणावर वार केला.

माझ्या प्रिय मुंबई शहराराच्या पाठी उभं राहण्यासाठी असे म्हणत, या बाईच्या डोक्यावर अपघात झाला आहे का ओ भाऊ ? असे ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी कंगणाला टोला लगावला.

मुंबईत परतात सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे कंगणा म्हणाला होती.

कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला.

मागील सहा महिन्यापासून कंगणाने महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती, सतत महाविकास आघाडी सरकारवर तोंडसुख घेत आहे. मुंबई महानगरपालिकेने तीच्या घरावर कारवाई केल्यानंर मुंबई महापालेकेला बाबर सेना असे म्हटले होते. त्यामुळे शिवसेना व कंगणा यांच्यात जुंपलेली आहे. आता पुन्हा कंगणाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment