Ads

-

मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यास नागरीकांचे सहकार्य महत्वाचे.

By Xtralarge News

December 29, 2020 7:28 pm

Ads

मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यास नागरीकांचे सहकार्य महत्वाचे.

 

मुंबई, दि. 29 डिसेंबर :

पुणे येथील मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी आणि शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. परंतु नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे येथील मुळा-मुठा नदीपात्रात प्रदुषण, पर्यावरण तसेच पुर प्रतिबंधाबाबत गुगल मिटद्वारे आयोजित वेबीनार बैठकीत त्या बोलत होत्या. वेबीनारमध्ये स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी, संबंधित शासकीय यंत्रणा सहभागी झाले होते.

डॉ. गोऱ्हे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी, जलसंपदा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रदुषण नियंत्रण विषयी सविस्तर आढावा घेतला. तसेच संबंधित विभागाकडून प्रदुषण,पुररेषा या विषयी तयार करण्यात आलेला आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचे प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहेत, ते मंजूर करुन घेण्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे सांगून पुणे आणि पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील शाश्वत विकास करण्यासाठी लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुळा-मुठा नद्यांचा प्रदूषण हा व्यापक विषय असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रदुषण विषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विषेश लक्ष देत असून वेळोवेळी आढावा घेत आहेत. घणकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, प्लास्टिकचा डांबरी करणासाठी वापर, नदी पुनरुज्जीवन, नदीत होणारे अतिक्रमणे, राम नदी आणि नद्यांमधील नामशेष झालेले बेटे, सांडपाणी पुर्नवापर आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी विजय देशमुख अपर जिल्हाधिकारी पुणे, रुबल अग्रवाल, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, सुहास दिवसे आयुक्त पुणे विकास प्राधिकरण, डॉ खेमणार अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा, सुरेश जगताप अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा, कुलकर्णी शहर अभियंता पिंपरी चिंचवड मनपा, शिंदे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे, प्रशांत खांडकेकर प्रादेशिक उपसंचालक विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, संजीव चोपडे अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग पुणे उपस्थित होते.

 

No comments to show.

Leave a Comment