Ads

-

अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी विशेष यादी..

By Xtralarge News

December 20, 2020 11:52 am

Ads

अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी विशेष यादी..

मुंबई, दि. 20 डिसेंबर:

अकरावीच्या ऍडमिशनसाठी गुरूवारपासून विशेष प्रवेश फेऱ्या सुरू होत आहेत. सत्तर हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या यादीची प्रतिक्षा आहे. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

अकरावीच्या रिक्त जागांचे तपशील २० डिसेंबरला जाहीर होणार आहेत. जवळपास ७० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून, तीन फेऱ्यांमधील प्रवेशाच्या अटीतटीनंतर आता विशेष फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर आता विशेष प्रवेश फेऱ्या सुरू होणार आहेत. सत्तर हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी या फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

यंदा वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी अटीतटीची स्पर्धा आहे. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या ६३ हजार ३५९ जागा होत्या. त्यासाठी ७४ हजार ५३६ अर्ज आले होते. त्यातील २८ हजार ८३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले होते. त्यानुसार उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. विशेष फेरीसाठी कोटय़ातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. मात्र, तरीही उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशोत्सुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

 

No comments to show.

Leave a Comment