Ads

---

अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार केले !

By Xtralarge News

December 19, 2020 12:13 pm

Ads

अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार केले !
बिबट्याने 12 जणांचा बळी घेतलेला

सोलापूर, दि. 19 डिसेंबर:
सोलापूरसह पाच जिल्ह्यात धुमाकूळ घालत १२ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात यश आले आहे. करमाळा तालुक्यातील मांगी येथे शार्प शूटरच्या गोळीबारात बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांत गेले काही दिवस या बिबट्याचा दहशत होती. शेतकरी व गावकरी या नरभक्षक बिबट्याला ठार त्रासले होते, या बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले होते पण हा बिबट्या गुंगारा देत होता.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाचे शार्प शूटर चंद्रकात मंडलिक यांनी या बिबट्याला ठार केले.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने १२ जणांचे बळी घेतले होते. एकट्या करमाळा तालुक्यातच तीन बळी घेतले होते. पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. उलट माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा आणि नाहीच सापडला तर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता.

या बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नर, औरंगाबाद, अमरावती, नांदेडहून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही कुमक मागवण्यात आली होती.

 

No comments to show.

Leave a Comment