Ads

--

अर्णब – कंगणाचा देवेंद्र फडणवीस यांना पुळका!

By Xtralarge News

December 15, 2020 4:28 pm

Ads

अर्णब – कंगणाचा देवेंद्र फडणवीस यांना पुळका !

अर्णब-कंगणावरील कारवाईवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल.

मुंबई, दि. 15 डिसेंबर:
संपादक अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ आज ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कायद्याच्या राज्यात कायद्यांनीच उत्तर द्यायचे असते. आज कुणी काही लिहिले, तर अटक झाल्याशिवाय राहत नाही. सरकारची सिलेक्टिव कारवाई सुरू आहे. विरोधी पक्षावर कुणी बोलले, तर कारवाई नाही आणि सरकारवर बोलले की अटक केली जाते हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले,’अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, ती चुकीचीच आहेत. मी त्याचा निषेधच करतो. त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. याच अर्णव गोस्वामी यांनी माझ्याही विरोधात ‘मीडिया ट्रायल’ चालवली होती पण मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. त्यांना उत्तर दिलं.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या घरावरील कारवाईवरही फडणवीसांनी आक्षेप घेतला. ‘खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे. पण इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्ही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू शकता. पण, मनात आलं म्हणून तुम्ही कोणाचं घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नाही. कंगनानं केवळ विरोधात ट्वीट केलं म्हणून तिचं घर तोडलं गेलं असं न्यायालयानं म्हटलं आहे. ‘सत्ता डोक्यात जाता कामा नये. राज्य कारभार कितीही काळ चालवा. २५ वर्षे चालवा. २७ वर्षे चालवा, पण कायद्यानं चालवा,’ असेही फडणवीस म्हणाले .

 

No comments to show.

Leave a Comment