Ads

-

TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक TV च्या सीईओला अटक

By Xtralarge News

December 13, 2020 12:41 pm

Ads

रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक..

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई.

अर्णब गोस्वामी ला मुंबई पोलिसांचा झटका..

मुंबई, दि. 13 डिसेंबर:

मुंबई पोलिसांनी आज अर्णब गोस्वामी यांना जबरदस्त झटका दिला. बनावट टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली.

पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं मोठं रॅकेट मुंबई पोलिसांनी उघड केलं होतं. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीसह इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं आली होती. त्यानंतर त्या दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे खानचंदांनी यांची चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी खानचंदानी यांना त्यांच्या घरी अटक केली.

मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी याचिका रिपब्लिक टीव्हीने सुप्रीम कोर्टात केली होती परंतु कोर्टाने मागणी फेटाळून लावत याचिका मागे घ्यावी असे म्हटले होते.

मुंबई पोलिसांची ही कारवाई अर्णब गोस्वामी साठी मोठा धक्का आहे.

 

No comments to show.

Leave a Comment