Ads

-

मुंबईकरांनो, सुधरा नाही तर रात्रीची संचारबंदी?

By Xtralarge News

December 11, 2020 11:43 am

Ads

मुंबईकरांनो, सुधरा नाही तर रात्रीची संचारबंदी?

महापालिका आयुक्तांची राज्य सरकारकडे शिफारस.

मुंबई, दि 11 डिसेंबर :
अनलाॅकच्या माध्यमातून सरकारने लोकांना सवलती दिल्या आहेत मात्र लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत.
मुंबईकरांचा बेजबाबदारपणा आणि नाईट क्लब मधील धिंगाणा लक्षात घेत मुंबईत रात्री ११ ते सकाळी ६ वाजे पर्यंत संचारबंदी लागू करावी असे पत्र महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे .

मुंबईतील ‘नाइट क्लब’मध्ये रात्रभर धिंगाणा सुरू असतो. मास्क घातले जात नाहीत, शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जाते. कोरोना निर्बंधांचे पालन होत नसल्याने मुंबईत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस इक्बालसिंह यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आयुक्त चहल म्हणाले की, मुंबईत लोअर परळ येथील ऍपीटोम आणि वांद्रे येथील अन्य एका नाईट क्लबमध्ये रात्री उशीरापर्यंत दोन-अडीच हजार लोक विना मास्क वावरताना आढळून आले. त्यामुळे पालिकेने संबंधित क्लबच्या विरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे. पण लोकांचे अशा प्रकारचे वर्तन सुधारले नाही तर नाईलाजाने रात्रीचा कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबतची मागणी केली आहे. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. जर या दिवसात त्यांचे वर्तन सुधारले नाही तर आम्हाला रात्रीचा कर्फ्यू लागू करावा लागेल.

 

No comments to show.

Leave a Comment