Ads

--

शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. 

By Xtralarge News

December 10, 2020 3:50 pm

Ads

शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा.

मुंबई दि. १० डिसेंबर:

देशातील शेतकर्‍यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन हा आरोप करुन शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान आहे असे सांगितले आहे त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

रावसाहेब दानवे हे केंद्रीयमंत्री आहेत त्यामुळे ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची भूमिका असेल तर तोमर यांच्यासोबत बैठका का घेतल्या. गृहमंत्री अमित शहा का बैठका घेत आहेत. आणि असं असेल तर सरकारने काय केलं आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment