Ads

-

आरोग्य विभागातील 8500 रिक्त पदे भरणार!

By Xtralarge News

December 7, 2020 8:08 pm

Ads

आरोग्य विभागातील 8500 रिक्त पदे भरणार !

राज्यात 500 नवीन रुग्णवाहिका आठवड्यात.

मुंबई, दि. 7 डिसेंबर:
राज्यातील आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची (8500) अनुमती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शासकीय रुग्णालयाची सेवा,स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे तो ही लवकरच मंजूर होईल.

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहीका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात 500 नवीन रुग्णवाहीका दाखल होतील. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील गरजू रुग्णांना यापुढे मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत असून कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही, यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment