Ads

--

आधी उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग फिल्मसीटीचं बघा..

By Xtralarge News

December 2, 2020 8:19 pm

Ads

आधी उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग फिल्मसीटीचं बघा..

राष्ट्रवादीच्या महेश तपासेंचा आदित्यनाथ यांना टोला.

मुंबई दि. २ डिसेंबर :

बाॅलिवूड मुंबईतून उत्तर प्रदेशमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आटापीटा करत असून त्यावर महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मनसे, शिवसेना, काँग्रेसनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही यात उडी घेतली आहे.

योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला लगावला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इंडस्ट्री नेण्याबाबत मुंबईमधील अभिनेत्यांशी चर्चा करायला आले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

योगीजी तुम्ही एक गोष्ट विसरलात उद्योग व व्यापाराकरिता भयमुक्त वातावरणाची आवश्यकता लागते जे तुमच्या उत्तरप्रदेशातील नागरिकांना तुम्ही देऊ शकला नाहीत. दिवसा ढवळ्या बलात्कार, लूटमार, अपहरण हे तुमच्या राज्यातली रोजची घटना झाली आहे. मग उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांचे संरक्षण तुम्ही कसे करणार असा प्रश्नही महेश तपासे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment