Ads

--

साईबाबाच्या दर्शनासाठी भारतीय पेहरावात या!

By Xtralarge News

December 2, 2020 11:43 am

Ads

साईबाबाच्या दर्शासाठी भारतीय पेहरावात या !

तोकडे कपडे घालून साईमंदिरात येऊ नका…

शिर्डी, दि. 2 डिसेंबर :
साईबाबांच्या दर्शनाला जात असाल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. मंदिर परिसरात प्रवेश करताना भारतीय पोषाख परिधान करावा. शिर्डी साईबाबा संस्थानने तसे आवाहन केले आहे.

अनेक भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येतात अशी तक्रार भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकही साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.

देशभरातून साईबाबाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. अनलॉक अंतर्गत शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. भारतात इतर काही मंदिरांतही भारतीय पेहराव असेल तरच प्रवेश दिला जातो. शिर्डीच्या साईबाबा संस्थानने सध्या आवाहन केले आहे, सक्ती केलेली नाही.

 

No comments to show.

Leave a Comment