Ads

--

…मग या देशात ‘हिदुस्थानी’ कोण? केवळ भाजपा?

By Xtralarge News

November 29, 2020 9:07 pm

Ads

सगळेच दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही मग ‘हिंदुस्थानी’ फक्त केवळ भाजपावाले का ?

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचा सवाल.

श्रीनगर, दि. 29 नोव्हेंबर:

जम्मू काश्मीरमध्ये सध्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती हल्ला केला.

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की “ काश्मीरमध्ये कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कोणी बोलण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर यूएपीएअंतर्गत खटला दाखल केला जातो.आमच्या उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी देत नाही. कलम ३७० हटवण्यावर चर्चा करू नका असे सांगितले जात आहे.

मेहबुबा पुढे म्हणाल्या की “भाजपावाले मुस्लीमांना पाकिस्तानी म्हणतात, सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलवादी म्हणतात तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात. प्रत्येक जण दहशतवादी, देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे? केवळ भाजपाचे कार्यकर्ते? असा सवाल त्यांनी केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment