Ads

-

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग!

By Xtralarge News

November 27, 2020 9:43 am

Ads

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग..
आगीत पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू…

राजकोट, दि. 27 नोव्हेंबर:
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील शिवानंद कोविड रुग्णालयाला भीषण आग लागून पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या रुग्णालयाच्या आयसीयू कक्षामध्ये आग भडकली होती. आयसीयू वार्डात ११ पेशंट उपचार घेत होते.

आगीत जखमी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या रुग्णालयातील कोविड पेशंटनाही दुस-या कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मावडी भागातील शिवानंद रुग्णालयात पहाटे आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यातील सहा जण बचावले तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयाला आग लागली होती, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता.

 

No comments to show.

Leave a Comment