Ads

--

औरंगाबाद-बीड हायवेवर भीषण अपघात, चार ठार!

By Xtralarge News

November 26, 2020 8:26 pm

Ads

औरंगाबाद-बीड हायवेवर भीषण अपघात, चार ठार!

गेवराई, बीड, दि. 26 नोव्हेंबर:

औरंगाबाद-बीड महामार्गावर गेवराई बायपासजवळ एक कार समोरून येणा-या टँकरवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे आपल्या कार्यकरत्यासह औरंगाबादला कार मधून जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे असलेल्या बायपास रोडवर कार येताच कारचालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून समोरून येत असलेल्या ऑईलच्या टँकरला धडकली.

अपघात इतका भीषण होता की टँकरला धडकल्यानंतर कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे यांचा समावेश असून राम भिंगे हे गंभीर जखमी असल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment