Ads

--

आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल!

By Xtralarge News

November 26, 2020 12:16 pm

Ads

आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा..

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर:

मला आव्हान दिले की जास्त स्फूर्ती येते. आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार एक वर्ष पूर्ण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखत हा इशारा दिला आहे.

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.

मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”. “विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळलं तेव्हा मला स्फुर्ती येते. आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल.

ही मुलाखत शुक्रवारच्या सामना मध्ये प्रकाशित केली जाणार आहे.

 

No comments to show.

Leave a Comment