Ads

-

महाराष्ट्रात 2100 कोटींचा GST घोटाळा, एकाला अटक.

By Xtralarge News

November 24, 2020 11:10 am

Ads

महाराष्ट्रात 2100 कोटींचा GST घोटाळा, एकाला अटक.

बोगस कंपन्यांच्या माध्यमातून १८५ कोटींचे टॅक्स तिबेट मिळवले.

मुंबई, दि. 24 नोव्हेंबर:
राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) मोठी कारवाई करत 2100 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला आहे. तीस कंपन्यांच्या माध्यमातून खोटी बिले वितरित करण्यात आली. या प्रकरणी दिलीपकुमार तिब्रेवाला या व्यक्तीस अटक करण्यात आली. महाराष्ट्रात जीएस अंतर्गत अशी पहिलीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दिलीपकुमार तिब्रेवाला याने 30 कंपन्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणी केली. या तीस कंपन्यांच्या आडून कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष विक्री अथवा सेवा न पुरविता तब्बल २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची विक्री बिले विविध कंपन्यांना वितरित केली. तिब्रेवाला यांनी कोणतीही सेवा न देताच वितरित केलेल्या या विक्री बिलामुळे संबंधित कंपन्यांना जवळपास १८५ कोटी रुपये इतक्या रकमेचे इनपुट टॅक्स रिबेट उपलब्ध करून दिले. सरकारचा तितक्याच रकमेचा महसूल बुडाला.

 

No comments to show.

Leave a Comment