Ads

--

मुंबईचा आगामी महापौर भाजपाचा तर उपमहापौर रिपाइंचा !

By Xtralarge News

November 22, 2020 7:32 pm

Ads

मुंबईचा आगामी महापौर भाजपाचा तर उपमहापौर आरपीआयचा !

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला रिपाइंचा पाठिंबा.

मुंबई दि. 22 नोव्हेंबर:
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत आरपीआय युती करेल. भाजप आरपीआयच्या युतीचा मुंबई महापालिकेत विजय नक्की होईल आणि भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्या पद्धतीने कार्यरत झाले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा प्रमुख सामना या निवडणुकीत होणार असुन त्यात आरपीआयची भीमशक्ती ज्यांच्या बाजूने त्यांचा विजय निश्चित असल्याने रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण लवकरच भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची व्यूहरचनेवर चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

No comments to show.

Leave a Comment