Ads

-

कॉमेडियन भारतीला ड्रग्ज प्रकरणात अटक.

By Xtralarge News

November 21, 2020 9:28 pm

Ads

बॉलिवूड स्टार्सकडे गाजांचा सुळसुळाट..

मुंबई, दि. २१ नोव्हेंबर
बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणात एक एक नाव उघड होत असून आता एनसीबीने कॉमेडीयन भारतीला ड्रग प्रकरणात अटक केली आहे. शनिवारी सकाळी या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारतीच्या घर आणि ऑफीसवर धाड टाकली. या धाडीत भारतीच्या घरात ८६.५ ग्रॅम गांजा सापडला तो एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. त्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे.

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड झाले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने बॉलिवूडमधील अनेक छोट्या मोठ्या कलाकारांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अर्जून रामपाल सारख्या बड्या स्टार्सची नावं समोर आली होती. या यादीत आता भारतीचे देखील नाव आले.

No comments to show.

Leave a Comment