Ads

-

कंगणा, हाजिर हो !

By Xtralarge News

November 19, 2020 11:41 am

Ads

कंगणा, हाजिर हो !
मुंबई पोलिसांचे कंगणाला तिस-यांना समन्स ..

मुंबई , दि. 19 नोव्हेंबर :

अभिनेत्री कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत. कंगणा व तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवले असून 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी दोनवेळा समन्स बजावूनही या दोघी हजर झाल्या नाहीत.

वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. कंगणावर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी गेल्या महिन्यात मुंबई वांद्रे कोर्टात कंगणा आणि रंगोलीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कंगना आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच धार्मिक तेढ निर्माण करत असून हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत कोर्टासमोर तिचे व्हिडीओ, ट्वीट्स सादर केले होते. यासर्व गोष्टींची शहानिशा करून कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

 

No comments to show.

Leave a Comment