Ads

--

अक्कलकोट स्वामींचे मंदिरही उघडले…..

By Xtralarge News

November 16, 2020 4:34 pm

Ads

अक्कलकोट स्वामींचे मंदिरही उघडले..

सोलापूर, दि. 16 नोव्हेंबर :
कोरोनामुळे आठ महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असलेल्या धार्मिकस्थळांचे दरवाजे दिवाळी पाडव्यापासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिरही आज पहाटे उघडण्यात आले.

वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात पहाटे नित्यनियमानुसार काकड आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर सर्व भक्तांसाठी उघडण्यास आले.

सामाजिक अंतर राखत, सॕनिटायझरचा वापर करत शिस्तीने मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्याआधी मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. मंदिरात एकाचवेळी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्या-टप्प्याने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता.

देवस्थान परिसरात शासकीय नियम व अटींचे तंतोतंत पालन करीत भाविकांना दर्शनासाठी मंदिरांमध्ये सोडले जात आहे.

एका तासात सरासरी १०० भाविक गाभाऱ्यासमोर उभे राहून स्वामींचे मुख दर्शन घेवून सुखरूप बाहेर निघतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सोयीकरीता मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे. भाविकांनी मंदीरात प्रवेश करत असताना मास्क घातलेला हवा व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment