Ads

-

नक्षलग्रस्त भागात पोलीसांसोबत गृहमंत्र्यांची दिवाळी.

By Xtralarge News

November 15, 2020 10:44 am

Ads

गडचिरोली, दि. 15 नोव्हेंबर:
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन पोलीसांबरोबर दिवाळी साजरी केली. गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला त्यांनी भेट दिली. गृह मंत्र्यांनी पोलीसांशी संवाद साधला.नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली.

देशमुख यावेळी म्हणाले, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पोलीस घरापसून, आपल्या आई-वडलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं.

माझं पोलिस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा…

पोलीसांच्या अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

 

No comments to show.

Leave a Comment