Ads

-

लक्ष दिव्यांनी उजळली प्रभूरामाची अयोध्या..

By Xtralarge News

November 13, 2020 9:35 pm

Ads

लक्ष दिव्यांनी उजळली प्रभूरामाची अयोध्या..

अयोध्या, दि. १३ नोव्हेंबर :
प्रभूरामाची नगरी अयोध्या आज लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. या दिपोत्सवात शरयू नदीच्या किनारा तब्बल ५ लाख ८४ हजार ५७२ तेलाचे दिवे लावण्यात आले होते. या भव्य दिपोत्सवाने एक नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे.

अयोध्येत या दीपोत्सवादरम्यान ‘राम की पैडी’ एका वेगळ्याच ढंगात सजवण्यात आली होती. राम राज्याभिषेक आणि दीपोत्सवामुळे अयोध्येत कित्येक वर्षानंतर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. दीपोत्सव कार्यक्रमापूर्वी शोभा यात्रा काढण्यात आली. रामाच्या स्वागतासाठी अयोध्या भव्य रुपात सजली होती. ‘राम की पैडी’वर रांगोळीची सजावटही करण्यात आली होती.

पुढच्या वर्षी तब्बल सात लाख दिव्यांनी अयोध्या नगरीला सजवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली. भाविकांच्या श्रद्धेच्या सन्मानासोबतच पर्यटकांना भारताच्या प्राचीन परंपरेशी जोडण्याचे कामही उत्तर प्रदेश सरकार करणार असल्याचे ते म्हणाले..

 

No comments to show.

Leave a Comment