Ads

-

नोटबंदी ही तर मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी!

By Xtralarge News

November 8, 2020 5:42 pm

Ads

नोटबंदी तर मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी !

मोदींच्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था रसातळाला..

नवी दिल्ली, दि. 8 नोव्हेंबर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली त्या घटनेला आज चार वर्ष झाली. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे पाऊल असल्याचे सांगितले पण त्यात सरकार तोंडावर आपटले. मोदी सरकार वर त्यावेळी ही सडकून टीका झाली होती आणि आज वर्ष झाली आजही त्यांच्या या निर्णयावर टीका होतेय.

काँग्रेसचे खा. राहुल गांधी नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना म्हणाले,’नोटबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र उद्योगपती यांची लोखो कोट्यवधी रूपयांची कर्ज माफ केली जावी. हे चुकून झालं आहे असं समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आलं आहे. हा राष्ट्रीय त्रासाच्या चार वर्षांसाठी तुम्हीही आवाज उठवला पाहिजे.

नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे दोन टक्क्यांपर्यंत नुकसान होईल असा इशारा दिला होता आणि तसेच झाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले,’ तुम्ही तुमचे पैसे बँकांमध्ये टाकले आणि मोदींनी बँकांमधील ते पैसे आपल्या मित्रांना देऊन टाकले. त्यांचे ३ लाख ५० हजार कोटी रूपयांचं कर्ज माफ करण्यात आलं. नोटबंदीनंतर मोदींनी चुकीच्या जीएसटीची अंमलबजावणी केली आणि दुकानदारांना संपवून टाकले, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

 

No comments to show.

Leave a Comment