बिहारी जनतेच्या मनात काय ?
नवी दिल्ली, दि. 7 नोव्हेंबर :
बिहार विधानसभा निवडणूक पार पडली आणि आता वेध लागले आहेत बिहारमध्ये काय होणार याचे. १५ वर्षांपासूनची बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सत्ता कायम राहणार, का बिहारच्या जनतेने यावेळी सत्ताबद्दलासाठी कौल दिला आहे. बिहार विधानसभेसाठीचे मतदान आज पार पडले आहे आणि आता लक्ष लागले आहेत ते १० तारखेच्या मतमोजणीकडे पण एक्झीट पोलचे अंदाज आलेले आहेत.
आज संध्याकाळी सर्व न्यूज वाहिन्यांचे एक्झीट पोल आले आहेत. हे एक्झीट पोल नितीशकुमार यांची झोप उडवणारे आहेत. भाजपाची कामगिरी सुधारलेली या आकडेवारीत दिसत आहे पण नितिशकुमार यांचा जदयु मात्र साफ तोंडावर आपटताना दिसत आहे.
विरोधी पक्षातून लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी धडाकेबाज आव्हान दिले आहे. काँग्रेस व इतर पक्षांबरोबर महागठबंधन करुन लढवलेल्या निवडणुकीत आजच्या एक्झीट पोलमध्ये सर्वच चॅनेल्सनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला कौल दिल्याचे दिसत आहे. हे एक्झीट पोलचे अंदाज आहेत. प्रत्यक्ष निकाल काय येतात हे पाहण्यासाठी १० तारखेची वाट पहावी लागणार आहे.
एक्झीट पोलच्या अंदाजानुसार..तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला १२० पर्यंत जागा मिळतील असा अंदाज आहे तर नितीशकुमार आणि भाजपा यांच्या आघाडीला ११५ पर्यंत जागेचा अंदाज आहे. यात भाजपाच्या वाट्याला ६५-७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. एखादा पक्ष किंगमेकर ठरून सत्तेची समिकरणे बदलूही शकतात.
Leave a Comment