Ads

--

दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे!

By Xtralarge News

October 25, 2020 10:07 pm

Ads

मुंबई, दि. २५ ऑक्टोबर..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जीएसटीच्या मुद्यावर केंद्र सरकारला घेरले. केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही. कर्ज काढण्याचा सल्ला देते तो कशासाठी. जीएसटी सदोष आहे तो रद्द करावा अशी मागणी सर्व मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जीएसटीच्या पैशावरून भाजपाच्या रावसाहेब दानवेंनी केलेल्या विधानाचाही उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘आम्ही बोललो, जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील. केंद्राकडे जून महिन्यापासून आपत्तीग्रस्तांसाठी पैसे मागितले. त्यासाठी एक छदाम आलेला नाही. मागायचे नाहीत का पैसे?

मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता? दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत. का पैसे मागायचे नाहीत. लग्न आम्ही केलं. जरूर केलं. पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाला, मोजतोय की काय करतोय देव जाणो,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी दानवेंवर पलटवार केला.

No comments to show.

Leave a Comment