Ads

-

चीनपेक्षा भारत अधिक सक्षम होणे गरजेचे!

By Xtralarge News

October 25, 2020 12:57 pm

Ads

नागपूर, दि. 25 ऑक्टोबर:

भारताने सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये चीनपेक्षा आधिक सक्षम होणं गरजेचं आहे. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही. आपली मित्रता कुणाला कमजोरी वाटत असेल, अशा राष्ट्रांना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपुरात पार पडला. पण करोनामुळे  विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती झाल्या नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हेडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. मोजक्याच ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

सरसंघचालक म्हणाले, ‘ संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून कोरोनासोबत लढा दिला आहे. कोरोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असं नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल.

२०१९ मध्ये काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यात आलं शिवाय ९ नोव्हेंबरला न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण देशानं हे निर्णय संयमानं स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर करोनावर संकट आलं, असे भागवत म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment