Ads

--

त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन!

By Xtralarge News

October 23, 2020 6:34 pm

Ads

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर:
भाजापाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये येताच नाथाभाऊंनी आपला इरादा बोलून दाखवला.

खडसे म्हणाले, ४० वर्षे ज्या पक्षात राहिलो तो पक्ष सोडावा असे कधी वाटले नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, भ्रष्टाचार झाला, तर कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपामध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला आहे.

खडसे पुढे म्हणाले की, ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो. तेव्हा एकदा जयंत पाटील यांच्यासोबत एकदा बोलत होतो. तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की, ‘तुम्हाला राष्ट्रवादीत यायचे आहे. पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय?’ जयंत पाटलांना मी म्हणालो त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन.

No comments to show.

Leave a Comment