Ads

-

लोकल लवकरच सर्वांसाठी सुरू होणार!

By Xtralarge News

October 21, 2020 4:26 pm

Ads

मुंबई, दि. २१ ऑक्टोबर:
मुंबईतील लोकलसेवा महिलांसाठी आजपासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी आता लोकलचे दरवाजे कधी उघडणार अशी विचारणा केली जात आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये एक एक क्षेत्र खुलं करण्याची परवानगी दिली जात आहे. लोकांना कामावर जावे लागते त्यामुळे लोकल सेवा सर्वांसाठी खुली करावी याची मागणी जोर धरू लागली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंबंधी रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात आज बैठक पार पडली. बैठकी नंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय़ वडेट्टीवार म्हणाले की, ‘मुंबईकरांना लोकलसाठी फारकाळ वाट पहायची गरज नाही. दोन ते तीन दिवसात यावर निर्णय होईल. सर्व संघटनांना विश्वासात घेऊन, त्यांच्या कामाच्या वेळाही लक्षात घेतल्या जाणार आहेत. गाड्यांची संख्या वाढवून मार्ग काढण्याचे ठरले आहे.’

मुंबईतील हॉटेल्स, बार, रेस्टारंट्स, दुकाने आस्थापने सुरु करण्यास आधीच परवानगी दिलेली आहे. कार्यालयात कामावर जाण्यासाठी लोकल हाच मुंबईकरांसाठी सुलभ पर्याय आहे. त्यामुळे आता लोकल सर्वांसाठी खुली करण्याची मागणी केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment