Ads

---

मोदीजी हीच वेळ…शत्रूला ५६ इंच छाती दाखवा !

By Xtralarge News

June 19, 2020 12:44 pm

Ads

मोदीजी हीच वेळ…शत्रूला ५६ इंच छाती दाखवा! रुपालीताई चाकणकर

मुंबई दि. १९ जून २०२०

चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर मोदीजी हीच वेळ आहे ५६ इंच छाती दाखवण्याची.. बलिदानाचा बदला घेण्याची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सडेतोड सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून चीनला १८ वेळा म्हणजे सरासरी वर्षाला तीनवेळा जावून आले आहेत. इतक्या चकरा मारुन साध्य काय झालं, असा सवालही रुपालीताई चाकणकर यांनी विचारला आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत या मुद्याला पुढे रेटत आपण ‘व्होकल फॉर लोकल’ची संकल्पना जनतेसमोर मांडत स्वदेशी नारा दिला आणि मागील काही दिवसापूर्वीच १२ जूनला दिल्ली-मेरठ मेट्रोच्या कामात L & T  या भारतीय कंपनीला डावलून चीनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलात? मग रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या म्हणजे आपल्याच ना? मग हा स्वदेशी अपनावोचा नारा कशासाठी? असा संतप्त सवालही रुपालीताई यांनी केला आहे.

एकीकडे चीनको लाल आंख दिखानी चाहीये, असे म्हणता आणि डोळे पांढरे होतील एवढी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट या चीनलाच देता? असं कसं चालेल आदरणीय मोदीजी? भारतीयांच्या भावनांशी खेळत माध्यमांना हाताशी पकडून मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करायचं आणि याच चीनच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायची ही आम्हा भारतीयांसकट तुम्ही स्वतःची फसवणूक करता आहात असं नाही वाटत का आपल्याला??असाही प्रश्न रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. जशास तसं उत्तर देण्याची धमक भारतात नक्कीच आहे. आता ती वेळ आली आहे. आपल्या शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेताना आपल्या ५६ इंच छातीत किती धमक आहे हे दाखवून देण्याची.

No comments to show.

Leave a Comment