Ads

-

राहुल गांधी यांनी शब्द पाळला !

By Xtralarge News

October 20, 2020 12:41 pm

Ads

वायनाड, दि. 20 ऑक्टोबर:

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी हे नेहमीच गरिब, वंचित, संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जातात. गरीबांना मदतीचा हात देण्यास ते तत्पर असतात याची अनेक उदाहरणं आहेत.  दिल्लीतील निर्भयाच्या कुटुंबाच्या मदतीला सर्वात आधी धावून गेले ते राहुल गांधी. हाथरसच्या मुलीला न्याय देण्यासाठी आघाडीवर राहिले तेही राहूल गांधीच. महाराष्ट्रातील कलावती यांनाही त्यांनी मदतीचा हात दिला होता.
आताही राहुल गांधी नेहमीप्रमाणे मदतीसाठी धावले ते सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींसाठी. २०१९ मध्ये कवलप्परा दुर्घटनेत दोन्ही बहिणींनी आपली आई व भावांना गमावलं. राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर या भगिनींना भेटून सांत्वन केले आणि नवीन घर देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन राहुल गांधींनी पाळलं असून दोघींकडे नवीन घराच्या चाव्या सूपूर्द केल्या.
कवलप्परामध्ये ८ ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या दुर्घटनेत कार्तिका आणि काव्या यांची आई आणि तीन भावांचा मृत्यू झाला होता. कार्तिका आणि काव्या शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी असल्याने या दुर्घटनेतून वाचल्या होत्या.
राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर कार्तिका आणि काव्याची भेट घेत आपल्याला शक्य ती सर्व मदत करु असे आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे मुलींना दिलासा मिळाला आहे.

No comments to show.

Leave a Comment