Ads

---

सरकारचा बचाव करणे हेच पवारांचे काम!

By Xtralarge News

October 19, 2020 12:31 pm

Ads

बारामती, दि. १९ ऑक्टोबर:
अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री, विरोधी पक्षाचे नेते तसेच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही दौऱ्यावर आहेत परंतु या दौऱ्यात राजकारणही जोरात सुरु आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारवर तोफ डागत खा. शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करणे हे एकमेव काम शरद पवार यांना उरले आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस आजपासून तीन दिवस नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी बारामतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणे एवढेच काम पवारांकडे आहे.

सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचे आहे.

No comments to show.

Leave a Comment