Ads

---

पंचनाम्याची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा.

By Xtralarge News

October 17, 2020 7:32 pm

Ads

शिर्डी, दि.१७ ऑक्टोबर:

अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत आशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील सर्वच विभागात थैमान घातल्याने शेतातील उभी पिक जमीनदोस्त झाली आहेत.हाता तोंडाशी आलेली पिक आणि रब्बीची सुरू असलेली पेरणी निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला असून,दुहेरी अर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकर्यावर आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.राज्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहीले तर सोयाबीन कांदा भाजीपाला कापूस ज्वारी तूर यांसह गाळपासाठी आलेले ऊसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात बाधीत झाल्याने साखर कारखान्यांसमोरही गाळपाचे मोठे आव्हान उभे राहीले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट पाहाता सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकर्यांंना सहकार्य करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.

यापूर्वी राज्यात वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले परंतू राज्य सरकारने फक्त पंचनामे करण्याचा फार्स केला.शेतकऱ्यांना कवडीचीही मदत जाहीर केली नसल्याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली परंतू राज्यातील एकही मंत्री झालेल्या नूकसानीची पाहाणी करण्यासाठी सुध्दा अजून फिरकला नाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सुध्दा वेळ नसलेल्या मंत्र्यांनी आता तरी बाहेर पडावे केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा आता तातडीने मदतीची घोषणा करावी शेतकर्यांंच्या खात्यात पैसे जमा करून दिलासा द्यावा आशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment