Ads

-

मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा.

By Xtralarge News

October 15, 2020 9:36 pm

Ads

मुंबई, दि.15 ऑक्टोबर:

महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती येथील पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.

यशोमती ठाकूर यांनी आठ वर्षांपूर्वी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता अमरावती न्यायालयाने या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या मारहाण प्रकरणात त्यांचा कार चालक आणि दोन कार्यकर्तेही दोषी ठरलेत.
या निकालानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मी स्वतः वकील आहे त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,  शेवटी सत्याचा विजय होईल.

यशोमती ठाकूर यांना शिक्षा सुनावताच भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment