Ads

--

तामिळनाडूतील दलित अत्याचार थांबवा!

By Xtralarge News

October 15, 2020 5:14 pm

Ads

तामिळनाडूच्या राज्यपालांना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पत्र.

मुंबई, दि. 15 ऑक्टोबर :

ग्रामपंचायतीच्या बैठकीला अनुसूचित जातीच्या महिला सरपंच या अध्यक्षस्थानी असताना देखील त्या दलित असल्याने त्यांना जबरदस्तीने जमिनीवर बसण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूत घडला आहे. तामिळनाडूमधील या दलित सरपंचांविरोधात करण्यात आलेल्या भेदभावाविरूद्ध काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे व्यथित झाले असून त्यांनी याप्रकरणाबद्दल तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली आहे.

लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या महिला अध्यक्षांना बैठकीत जमिनीवर बसण्यास भाग पाडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उच्च जातीच्या उप सरपंचांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ राऊत यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.  तसेच या प्रकरणात दोषी असलेले उपसरपंच आणि अन्य पंचायत सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे तसेच आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. राऊत यांनी तामिळनाडूच्या राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांना पत्राद्वारे केली आहे.

भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी एससी / एसटी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि दलित आणि महिलांवरील भेदभाव दूर करण्यासाठी सामाजिक जनजागृती मोहीम राबविण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे.

No comments to show.

Leave a Comment