Ads

--

MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली!

By Xtralarge News

October 9, 2020 7:10 pm

Ads

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर:
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच होत असलेल्या एमपीएसी परीक्षा घेऊ नये अशी मागणी केली जात होती. अखेर मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल”.
एमपीएसीच्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

No comments to show.

Leave a Comment