Ads

-

‘शक्तीपीठ’ला विरोध असतानाही भूसंपादनाची अधिसूचना.

By Xtralarge News

June 12, 2026 1:27 pm

Ads

‘शक्तीपीठ’ला विरोध असतानाही भूसंपादनाची अधिसूचना.

मुंबई, दि. १२ जून २६:-

शक्तीपीठ महामार्गाला लोकाचा स्पष्ट विरोध असतानाही भूसंपादनाची अधिसूचना जारी करून सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी सरकारवर केली आहे.

जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की,  शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सातत्याने या प्रकल्पाला विरोध करत असताना सरकार मात्र हा प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न करत आहे. विकासाच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा हा डाव आहे.

लोकांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देता घेतलेला हा निर्णय अत्यंत तुघलकी आहे. जनतेच्या हिताला डावलून घेतले जाणारे असे निर्णय महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. सरकारने आपल्या भूमिकेबाबत पुनर्विचार करावा आणि लोकभावनेचा आदर करावा असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

No comments to show.

Leave a Comment