D. K. शिवकुमार यांचा ऐतिहासिक शपथविधी संपन्न..
बंगलुरु, दि. ३ जून २०२६..
डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली, शिवकुमार यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन पदाची शपथ घेतली तर जी. परमेश्वर यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच इतर १३ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे, के. जी. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जाखोली, कृष्णा बायरेगौडा, यू. टी. खेदर, ईश्वर खंड्रे, बायराथी सुरेश आणि शरण प्रकाश पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

डी. के. शिवकुमार यांनी, शपथविधी समारंभापूर्वी लोक भवनात आई गौरम्मा यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. या शपतविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

डी. के. शिवकुमार यांचा जन्म 15 मे 1962 रोजी रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1989 मध्ये त्यांनी कनकपुरा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात २०२४ साली निवडणूक लढवून देवेगौडांचा पराभूत केला. शिवकुमार यांनी सलग 8 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. शिवकुमार हे कर्नाटकातील वोक्कलिगा समाजातून येतात. कर्नाटकच्या राजकारणात ‘लिंगायत’ समाजानंतर वोक्कलिगा हा दुसरा सर्वात मोठा समाज घटक आहे.
Leave a Comment