Ads

--

NEET पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला अटक..

By Xtralarge News

May 19, 2026 1:21 pm

Ads

NEET पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला अटक

मुंबई, दि. १९ मे २०२६..

NEET पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. मोटेगारकरची शुक्रवारी ११ तास चौकशी केल्यानंतर सीबीआयने मोटेगावकरला अटक केली. लातूरमधील पेपरफुटीच्या कनेक्शनचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. या पथक आरसीसीच्या कार्यालयात दाखल झाले व त्यांनी अनेक कागदपत्रे, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेतले. यावेळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पेपरफुटी प्रकरणी CBI ने पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना  केली होती, कुलकर्णी यांच्या चौकशीतून शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आले होते, त्यानुसार सीबीआयने त्यांना पुण्यातून अटक केली. मोटेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रीय सदस्य असल्याचे अटक करताना सीबीआयने सांगितले. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका २३ एप्रिललाच त्याच्याकडे होती. परीक्षा झाल्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी फोनमधून प्रश्नपत्रिका डिलिट केली. परंतु सीबीआयने मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठविल्यानंतर डेटा रिकव्हर करण्यात आला.

या प्रकरणात सीबीआयकडून सलग चौकशी आणि छापेमारी सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा आहे. नीट परीक्षेसाठी देशभारतून तब्ल २३ लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटी उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments to show.

Leave a Comment