Ads

---

नाना पटोलेंचे सरकारविरोधात जलसमाधी आंदोलन..

By Xtralarge News

May 16, 2026 10:52 am

Ads

नाना पटोलेंचे सरकारविरोधात जलसमाधी आंदोलन..

भंडारा, दि. १६ मे २०२६:

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निद्रिस्त महायुती सरकारला जागे करण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

व्होटचोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकरीविरोधी आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील सरकार आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा” असे आश्वासन देऊन सत्तेत आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी प्रक्रियेत विविध निकष लावून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.

दावोस येथे जाऊन हजारो कोटींचे करार केवळ कागदोपत्री केले जातात, राज्यातील वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आजही भंडारा-गोंदिया जिल्ह्यात रोजगार निर्मिती झालेली नाही. शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवत संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घालून समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे पाप हे सरकार करत आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. राज्याला डबघाईला नेणाऱ्या या निद्रिस्त सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज संपूर्ण भंडारा-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने सरकारविरोधात क्रांतीचा एल्गार पुकारला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन असेच सुरू राहील..

No comments to show.

Leave a Comment