पेट्रोल व डिझेल ३ रुपयांनी महागले..
मुंबई, दि. १५ मे २०२६.
अमेरिका इराण युद्धाचे संकट आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम अखेर आता भारतातही जाणवू लागला आहे. आज १५ मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेली ही ₹३ हून अधिकची अचानक आणि मोठी वाढ सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी ठरली आहे. तेल कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते भुवनेश्वर अशा विविध ठिकाणांसाठीचे नवीन दर जाहीर केले आहेत.
या दर वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 रुपये वरून 97.77 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 87.67 रुपये वरून वाढून 90.67 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल १०६ रुपये तर डिझेल ९३.१४ रुपये झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात ‘ब्रेंट क्रूड’ने प्रति बॅरल १०६ डॉलर्सचा टप्पा ओलांडणे ही गुंतवणूकदारांसाठीची मुख्य चिंतेची बाब ठरली आहे. तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अधिक मोठी वाढ करतील, अशी बाजाराची अपेक्षा होती परिणामी, सध्याचा निर्णय हा बाजाराच्या अपेक्षांच्या तुलनेत काहीसा कमकुवत मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर (WPI) वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे.
Leave a Comment