रुपाली चाकणकरांची ED चौकशी.
मुंबई, दि. १५ मे २०२६.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ED ने ८ तास चौकशी केली. अशोक खरातसोबत माझे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. मी त्यांना गुरू मानत होते, तो फक्त श्रद्धेचा भाव होता, असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांनी २०२१ मध्ये एकत्र गुवाहाटीचा दौरा केला होता, यावेळी रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरही गुवाहाटी दौऱ्यावर होत्या त्यावर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, खरात यांचे कुटुंब अगोदरच गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत गेलो होतो. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. यापूर्वी गुवाहाटीला देवीचे दर्शन घेतलेले नव्हते, त्यामुळे गुरुसोबत देवीचे दर्शन करता आले तर छान होईल, असा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही पुण्याहून गेलो होतो आणि खरातसोबत देवीचे दर्शन घेतले, असे रुपाली चाकणकरांनी सांगितले.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, खरात प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही, समता पतसंस्थेसोबत माझ्या बहिणीचा कोणताही संबध नाही. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही, असेही रुपाली चाकणकरांनी सांगितले.
Leave a Comment