Ads

--

राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचा खर्च कोण करते?

By Xtralarge News

May 14, 2026 1:46 pm

Ads

राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचा खर्च कोण करते?

नवी दिल्ली, दि. १४ मे २०२६.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनांवर राहुल गांधी यांन टीका करताच भाजपाने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या २२ वर्षांत ५४ वेळा परदेश प्रवास केला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रवासाचा खर्च वैयक्तिकरीत्या, सरकारकडून की परदेशी संस्थांमार्फत करण्यात आला होता,असा प्रश्न भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत, भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, भारतातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते असलेले राहुल गांधी, गेल्या जवळपास २२ वर्षांपासून खासदार आहेत, त्यांनी या २२ वर्षांत ५४ वेळा परदेश प्रवास केला आहे. राहुल गांधींनी केलेल्या प्रत्येक परदेश दौऱ्यावर त्यांच्यासोबत साधारणपणे ३ ते ४ व्यक्तींनी प्रवास केला आहे.त्यांच्या परदेश दौऱ्यांवरील एकूण खर्च ६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आमच्याकडे २०१३-१४ ते २०२२-२३ या कालावधीतील राहुल गांधींच्या उत्पन्नाचे तपशील उपलब्ध आहेत. या दहा वर्षांच्या काळात राहुल गांधींचे एकूण उत्पन्न ११ कोटी रुपये होते. ११ कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी राहुल गांधी यांनी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत.” असे संबित पात्रा यांनी म्हचले आहे.

No comments to show.

Leave a Comment