Ads

--

V. D. सतीशन केरळमचे नवे मुख्यमंत्री.

By Xtralarge News

May 14, 2026 12:54 pm

Ads

V. D. सतीशन केरळमचे नवे मुख्यमंत्री.

थिरुअनंतरपुरम, दि. १४ मे २०२६..

केरळममधील मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या सर्व अटकळींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत झालेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाने व्ही. डी. सतीशन यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषणा केली आहे.

४ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सातत्याने चर्चा सुरू होत्या; मात्र, काँग्रेस पक्षाने आता अंतिम निर्णय घेत व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला अधिकृतपणे पसंती दर्शवली आहे. काँग्रेस पक्षांतर्गत नऊ दिवस चाललेल्या तीव्र अंतर्गत कलहानंतर, अखेर केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

व्ही. डी. सतीशन यांच्या नावाबाबतचा हा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. आता केरळ काँग्रेस समिती, राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊ शकते.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘यूडीएफ’ला (UDF) मिळालेल्या निर्णायक जनादेशानंतर, दहा दिवस चाललेल्या सखोल विचारमंथनानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला व सतीशन यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आघाडीवर होती. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे निरीक्षक व वरिष्ठ नेत्यांनी आमदारांशी चर्चा करुन निर्णय घेतला आहे. व्ही. डी सतीशन यांचे नाव निश्चित करण्यापूर्वी थिरुअनंतपूरम व दिल्लीत वारंवार चर्चा करून सखोल चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment