Ads

--

तामिळनाडूत नव्या युगाची सुरुवात..

By Xtralarge News

May 10, 2026 6:15 pm

Ads

तामिळनाडूत नव्या युगाची सुरुवात..

चेन्नई,  दि. १० मे २०२६.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून अखेर जोसेफ विजय यांचा चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर शानदार शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी होताच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी तीन महत्वाच्या निर्णयावर सही केली. यामध्ये २०० युनिट मोफत वीजपुरवठा, सिंगा पेन्ने योजना, विशेष महिला सुरक्षा दल आणि अमली पदार्थ विरोधी कृती दल यांचा समावेश होता.

आपल्या समर्थकांना संबोधित करताना जोसेफ विजय म्हणाले, प्रिय तामिळनाडूवासीयांनो, मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही मला सेवेची ही संधी दिली आहे. तुमच्या अथांग प्रेमाने आणि विश्वासाने मला या पदापर्यंत पोहोचवले आहे. तामिळनाडूला एक नवीन, समृद्ध आणि न्यायपूर्ण भविष्य देण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी कार्य करीन.
राहुल गांधी केवळ माझे सहकारी नाहीत, तर ते माझे भाऊ आहेत. आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्माचे असलो तरी, आपण सर्व एक आहोत. तामिळनाडूमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही. सर्व धर्मांमध्ये बंधुभाव आणि सलोखा राखणे हे आमचे प्राधान्य असेल. आपण एकत्र राहून राज्याचा विकास करू.
“आजपासून खऱ्या, धर्मनिरपेक्ष, सामाजिक न्यायाच्या एका नव्या युगाची आता सुरुवात होत आहे.” ख्रिश्चन असो वा मुस्लिम अल्पसंख्याक समुदाय, घाबरण्याची गरज नाही, आमचे सरकार सर्वांच्या पाठीशी उभे राहील.

जनतेची सेवा करणे हे त्यांचे प्रथम प्राधान्य असेल. महिलांची सुरक्षा, तरुणांसाठी रोजगार आणि दारूबंदी यांसारख्या मुद्द्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचारमुक्त शासन आणि पारदर्शकतेचे आश्वासन दिले.

No comments to show.

Leave a Comment